Monday, July 26, 2010

बिन तेरे..........

काल पावसात भिजताना तुझी आठवण आली, आणि माझ्या वर्तमान काळाने भविष्यात जाणे नाकारले. प्रेम काय असते हे तूच मला शिकवले .. किंबहुना प्रेम हे तुझ्यापेक्षा काही वेगळे आहे हे मी विसरलोच होतो. शून्य झालो होतो तू मिळण्या आधी मी, पण मला पुर्नत्व दिले तू.  शुन्याला काहीच किंमत नसते जोपर्यन्त त्याच्या आधी काही आकडा नसतो ... माझ्यासाठी तो आकडा म्हणजे तू होतीस.  जीवनाची आशा आणि दिशा तूच होती माझ्यासाठी ... तू सोबत असतांना एवरेस्ट ही पदक्रांत करेन असा विश्वास होता.. आणि तू साथ दिली तर काहीही करून दाखवीन ही हमी दिली होती मी तुला.. तुही दाखवले अनेक स्वप्न मला.. तूच दिला होता आधार मला.. वाटल सर्व बदलेल .... सुखाचे दरवाजे उघडतील ... जे नाही झाले आतापर्यंत ते सर्व होईल... आनंद आपल्या पायाशी असेन.........
परंतु नियतीला हे मंजूर नव्हते.. मी तुला दगा दिला की तू मला की मग कोणीतरी आपल्याला दगा दिला हा प्रश्न आता गौन आहे.... दुख आणि फक्त दुख हेच जीवनात उरले आहे.. तू जिथेही असशील सुखी राहा हीच या तुटलेल्या हृदयाची इच्छा आहे .. प्रेम म्हणजे फक्त मिळवणे नाही तर प्रेम म्हणजे देणे हीच जीवनाची सत्यता आहे...
आज मी एकटा बसून जेव्हा भूतकालाकडे बघतो तेव्हा सोबतीला माझ्या फक्त अश्रू आहेत. विसरन तुला अशक्य म्हणून तुला न आठवायच आज मी ठरवल आहे... प्रेमा पोटी या मी माझेच सर्वस्व हरवले आहे..
कुणाला दोष देऊ मी माझया एकटेपणाचा हा विचार आज मी करत आहे आणि भुपिंदर ची गझल ऐकत आहे

तेरे जहाँ में ऐसा नहीं कि प्यार न हो
जहाँ उम्मीद हो इसकी, वहाँ नहीं मिलता
कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता
कहीं ज़मीन तो कहीं आसमान नहीं मिलता

मी सर्व विसरून कितीही पुढे गेलो आणि हवे ते सर्व काही मिळवले तरीही.....

बिन तेरे बिन तेरे बिन तेरे......कोई खलिश हे हवानओ मे बिन तेरे... कोई खलिश हे हवानओ मे बिन तेरे........


या ब्लॉग मधील सर्व पात्र काल्पनिक असून त्याचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. असल्यास तो केवळ योगायोग सामजावा...

4 comments:

Chandresh Shah said...

Really very nice...
Premat padla ka re bahva...

Sachin Acharya said...

nahi mere yaar.... bas kuch achcha likh ne se resist nahi kar pa rahahu khudko ;)

Smruti... D Memory ! said...

lihila kharach chhan aahe..no doubt. Pan ohhh writer mahashay kadhi tar hasare vha ho. May god bless u.

Sachin Acharya said...

Kadachit mala hasne he dukhatunach milel ase vatte.. ani mhanun me nehmi dukhat sukh shodhnyacha avirat prayatna karat asto ....