Friday, July 16, 2010
क्षमा परमो धर्म
वात आज खूप आनंदात होती, कारणच असे होते; तिला तिचे नवीन घर मिळणार होते..जसे प्रत्येक मुलीचे स्वप्न तसेच तिचे होते. आणि शेवटी तिच्या आई ने तिला दिव्याच्या स्वाधीन केले. घर छोटे होते, त्यातच आजूबाजूला खूप सारे तेल. २ दिवसानंतर वात दिव्याला म्हटली मला घुसमटते आहे इथे. तू तर शहाना तसाच राहशील मी तर इथे जळते आहे. एकीकडे आग आणि एकीकडे तेल किती रे त्रास होतो?. दिव्या ने खूप समजवले पण वातिने नाही ऐकले. तिने घर सोडण्याचाया विचार पक्का केला. तेला ने आणि अंधारा ने ही पुष्कळ समजवले पण वात रात्री पळाली. दिवा खूप रडला. वात पेटलेली होती, ती सैरवैरा उडाया लागली. आज ती स्वतन्त्र्य होती.. अरे हे काय ती जाळायला लागली तेला अभावी, चुकुन एका घराला आग लागली तिच्याकडून, तिला आपली चुक कळली ती परत घरी परतली. सर्व ठीक झाले. सर्वांना वाटले दिव्या ने माफ केले वातीला.
खूप दिवस झाले, दिव्याच्या मनातून सूड भावना जात नव्हती. त्याला वातीचा आनंद जणू नकोसा झला होता. त्याने मनात निश्चय केला की वातीला धडा शिकवायचा... वातीवर सूड उगवायचा. तेलाशी संगणमत करून त्याने स्वताला एक बारीक खडडा केला, आणि सारे तेल आनंदाने वाहून गेले. ... वात जाळायला लागली.. तेलाशिवाय ती कासावीस होऊ लागली ... तिचा श्वास जणू थांबला होता.. ती पुर्नच जळाली असती .. पण वारा मदतीला धावून आला.... त्याने लगेच तिला एका दुसर्या दिव्यात टाकले.... आणि वात वाचली. तेवढ्यात कुठून तरी आवाज आला "दिवा फुटलेला दिसतो.. आता काही कामाचा नाही तो, फेक त्याला" ... दिवा घाबरला परंतु आता खूप उशीर झला होता.. वातीला केले होते माफ त्याने परंतू त्याला माफी नव्हती आज. वातीला ही रडू फुटले आठवले तिला दिव्याची ती साथ ... परंतू आता तिला तिचे आयुष्य नव्याने सुरू करायचे होते एका नव्या दिव्यसोबत.... वार्या ने अके अस्रु गालला .. परंतु त्याला ही बरेच काम होते त्यामुळे ते दुख विसरून तो पुन्हा कामाला लागला. आणि शेवटी दिव्याला फेकण्यात आले अशा ठिकाणी जिथे फक्त अंधार होता...
तेल ही थोडे नाराज होते.. शेवटी दिव्याच्या नाशास तोही कारणीभूत होता. परंतू त्याला एक जीवनाचे सत्य समजले होते.. आणि त्याने ठरवले.. ते सत्य सार्या जगाला सांगायचे .... "सूड जीवघेणा असतो दुसर्यांनाही आणि स्वतालाहि, मात्र क्षमा परमो धर्म!!!"
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
Hey dude...
It is really nice one....
Keep it up...!!
need more to read some nice article... :)
Very nice dude, i m definately adding this blog to my list.
Thank you for this.
competition mein phirse aage nikal gaye, let me cope with u :)
very nice article. :D
Hey dude,
Its very nice. keep it up :)
Post a Comment