Monday, June 11, 2012

मी कधीच हरणार नाही ...

माझी प्रिया ही माझी असावी,
भले ती मुक्त स्वच्छंद फिरावी,
कैद मजकडे तिची सावली असावी,
विरहाची कधी भीती नसावी

बंध नको मला तिची साथ असावी,
तीज सोबतच जगण्याची आस असावी,
असने तिचे चैतन्य देई मजला,
नसली तरी एकटे पणाची जान नसावी..

जीवन माझे बहुमूल्य,
ही ठेव आहे कैक जनांची,
प्रिये तू मला सोडले तरी,
गरज आहे मला जगण्याची..

तुझा विरह असह्य असला तरी,
मी आज रडणार नाही,
प्रीती हि जपेन सर्वदा..
मात्र जीवनात मी कधीच हरणार नाही ...
मात्र जीवनात मी कधीच हरणार नाही ...

No comments: