Sunday, July 8, 2012

शब्दच्छल

तुझ्या विरहाने व्याकूळ, हि वेळ संपत का नाही ..
श्वास संपलेत पण तुझी भेट होत का नाही ...

जवळ असतांना कधी तुझी किंमत केली नाही ..
तुझ्या प्रेमाचे मोल किती अनमोल, हे जाणून घेतले नाही ..
आज वेळ आहे पण तू नाही, हि जाणीवच भयानक आहे ..
उद्यातरी तू भेटणार , या आशेवरच मी जिवंत आहे ..

प्रेम माझे वेगळे, त्याची तऱ्हा हि न्यारी ..
बोललो जरी नसेन, तरी सदैव उल्लेख तुझा ओठावरी..
कितीही दूर जरी गेलो मी तुला सोडून,
फक्त तू आणि फक्त तूच आहे माझ्या विचारी ....

Monday, June 11, 2012

मी कधीच हरणार नाही ...

माझी प्रिया ही माझी असावी,
भले ती मुक्त स्वच्छंद फिरावी,
कैद मजकडे तिची सावली असावी,
विरहाची कधी भीती नसावी

बंध नको मला तिची साथ असावी,
तीज सोबतच जगण्याची आस असावी,
असने तिचे चैतन्य देई मजला,
नसली तरी एकटे पणाची जान नसावी..

जीवन माझे बहुमूल्य,
ही ठेव आहे कैक जनांची,
प्रिये तू मला सोडले तरी,
गरज आहे मला जगण्याची..

तुझा विरह असह्य असला तरी,
मी आज रडणार नाही,
प्रीती हि जपेन सर्वदा..
मात्र जीवनात मी कधीच हरणार नाही ...
मात्र जीवनात मी कधीच हरणार नाही ...