शुक्रवार म्हणजे रात्रीची वेळ आपलीच कारण शनिवार सुट्टी.. मी ठरवल की आज मराठी चित्रपट बघायचा. "गोष्ट छोटी डोंगराएवढी" बरच ऐकले होते या चित्रपटाबद्दल, शेवटी बघायचा ठरवल.
चित्रपट तसा सुरू झला तेव्हा मला वाटले अजुन एक मकरंद चा कॉमेडीपट ..परंतु जशी जशी कहाणी पुढे जाउ लागली तसा चित्रपटाचा आशय कळू लागला. खरच समाजातील एका महत्वाच्या मुद्द्याला दिग्दर्शकाने हात घातला आहे. वर्तमानपत्रांसाठी आणि न्यूज़ चॅनेल्स साठी कदाचित "शेतकर्यांच्या आत्महत्या" ही एक पहिल्या पानावरची बातमी किवा ब्रेकिंग न्यूज़ असेल परंतु त्यांच्या कुटुंबांची झालेली अवहेलना आणि त्रास कदाचित कोणीच समजून घेतला नाही. भारतासारख्या शेती प्रधान देशात असे काही व्हावे हे नवलच. भारताला महासत्ता करू इच्छिनार्या राजकारण्याना कोन समजावणार की "अन्न पाणी आणि निवारा" यामधील अन्नाची गरज जोपर्यंत शेतकरी भगवताहेत तोपर्यंतच हे स्वप्ना शक्य आहे आणि त्यामुळे ही आपली व समाजाची नैतिक जबाबदारी आहे की आपण शेतकर्यांच्या प्रश्नाला मुळापासून सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कदाचित मी हे बोलून छोट्या तोंडी मोठा घास घेण्याचा प्रयत्न करत असेन, परंतु मला विश्वास आहे की देशातील सर्व स्तरातील लोक जेव्हा ह्या समस्येला आपली समस्या समजून सोडवण्याचा प्रयत्न करतील, आपले शेतकरी बांधव नक्कीच ह्या विवंचनेतून मुक्त होतील.
चित्रपटाचा शेवट मला थोडा काल्पनिक वाटला, आणि एखाद्या नेत्याला वेठीस धरून सोडवण्यासारखी ही समस्या तेवढी सोपी नाही. यासाठी शासकीय तसेच सामाजिक पातळीवरून आर्थिक तसेच सामाजिक शिक्षणाची मदत गेली पाहिजे. शेतकरी बांधवांना मूळ प्रवाहापासून वेगळे ना होऊ देता त्यांनाही आपण सोबत नेले पाहिजे. शेतकर्यांच्या प्रगतीतूनच आपण भारताच्या प्रगतीचे स्वप्न पाहु शकतो.
No comments:
Post a Comment