कोणीतरी हवं असतं आयूष्याची गाडी रूळावर आणायला
थोडं आवरायला आणि थोडं सावरायला
तारुण्यात त्याचे ध्येय वेगळेच असते,
मधेच तिचे आगमन होते,
"माझं" संपून आता "आपलं" होतं
कारण आयुष्यात कोणीतरी हवं असतं
थोडं आवरायला आणि थोडं सावरायला
तारुण्यात त्याचे ध्येय वेगळेच असते,
मधेच तिचे आगमन होते,
"माझं" संपून आता "आपलं" होतं
कारण आयुष्यात कोणीतरी हवं असतं
संसाराचं गाडं दोघांनी चालवायचं असतं
संसाराचं गाडं दोघांनी चालवायचं असतं
ती चिडणार हे गृहीतच धरायचं असतं
रागाला तिच्या प्रेमाने निवलायाच असतं
रागाला तिच्या प्रेमाने निवलायाच असतं
कारण आयुष्यात कोणीतरी हवं असतं
मुलं झाल्यावर दोघांनी स्वतःला विसरायचा असतं
एकमेकांना मात्र सावरायचं असतं
मुलं असतातच महत्वाची
मात्र एकमेकांचं अस्तित्व विसरायचं नसतं
मोठी झाल्यावर पोरं स्वतंत्र होतात
समजायला आपल्याला अवघड होतात
अशा वेळी एकमेकांनीच जाणून घ्यायचं असतं
एकमेकांची काठी होऊन आधार द्यायचं असतं
आणि मग पटतं का एकमेकांची काळजी घ्यायची असते
बाकी कोणी नसते एकमेकांशीच बोलायचे असते
म्हणून सांगतो मित्रांनो अहम बाजूला ठेवायचं असतं कारण आयुष्यात कोणीतरी हवं असतं
No comments:
Post a Comment