Friday, February 11, 2011

स्वातंत्र्य कधीच मिळणार नाही मला ........

स्वातंत्र्य स्वातंत्र्य काय असते हे कधी कळलेच नाही मला
रटाळ या जीवनातील गुलामगिरी कधी कळलीच नाही मला ..
स्वातंत्र्याचा धडा जेव्हा गिरविला माझ्याकडून लोकांनी
आनंदाचा कळस मी गाठला होता तेव्हा ...
तरी खूप दुख झाले कितीत्तारी आयुष्य वाया गेले
कळसूत्री च्या बाहुली प्रमाणे कुणीतरी आपल्याला नाचवले..

आज मी स्वतंत्र आहे ...दुसऱ्याचा गुलाम नाही ...
स्वतः मीच राजा असा अनुभव दुजा नाही ..
काळ गेला थोडा ..उतरली धुंद..
स्वातंत्र्याने मी झालो बेधुंद...
मी काय करतो याचा मलाच ठाव नाही ...
हक्क हक्क म्हणतो फक्त, कर्तव्याची जान नाही

स्वतासाठी जगतो आता मारायची इच्छा नाही ..
स्वताचाच गुलाम झालो मी ..हे मला कळलेच नाही ..
जीवनाच्या पलीकडे जाऊन काय असते हे पाहण्याची खूप इच्छा आहे मला..
परंतु या बंधांनी एवढे जकडून ठेवलंय कि स्वातंत्र्य कधीच मिळणार नाही मला ... स्वातंत्र्य कधीच मिळणार नाही मला

1 comment:

Anup Daware said...

Wah... chan aahe... aagdi khare...