स्वतासाठी जगले ते काय जगले .. समाजासाठीही चला काही करू
हेच ध्येय आणि उद्दिष्ट मना स्मरूनी, जीवनाची हि वाट चालू
अनेक उदाहरणे होती समोरी... आदर्श हि नव्हते थोडके..
आम्हीही मग उचलले पाउल .. म्हटले "दिखायेंगे ये भी करके"
अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आता आम्हीही लढवय्ये तयार होतो
निर्भयता आणि नीती सारखी तत्वे आता आम्हीही जगणार होतो
रणशिंग फुंकले जेव्हा विचारांचे .... मनात दुसरे काहीही नव्हते ...
एकेक श्वास यास वाहू ... हेच मनाशी बिंबवले होते
उद्देश आणि कर्तुत्वाची पूर्ण जान आम्हाला होती
पण ना जाणो कुठेतरी काही माशी शिंकली होती
जगाला प्रकाश देणारा दिव्याला स्वताखालच्या अंधाराची जान नव्हती
जगा दिपविले उजेडाने .. पण त्याची खरी गरज त्याच्या घरालाच होती
आम्हीही असेच पामर, जगात क्रांतीचा डंका पिटतो
घरात मात्र रोज आमच्याच ... अन्यायाचा भडका उठतो
मलाच आज माझ्या अकर्तुत्वाची लाज वाटत आहे
तरीही मी मान खाली घालून अजूनही निर्लज्जपणे जगत आहे