Monday, June 22, 2009

Pahile na me tula....

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

हिमवर्षावातही कांती तव पाहूनी
तारका नभातल्या लाजल्या मनातुनी
ओघळले हिमतुषार गालावर थांबले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

का उगाच झाकिशी नयन तुझे साजणी
मृदु शय्या टोचते स्वप्न नवे लोचनी
पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी
रूप देखणे बघून नयन हे सुखावले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले
गीत-शांताराम नांदगावकर
संगीत-अनिल-अरुण
स्वर-सुरेश वाडकर
चित्रपट-गुपचुप गुपचुप (१९८३)